माजी महापौर संदीप कोतकर यांची विधानसभा निवडणुकीतून माघार घेणार?
अहमदनगर – नगर शहर विधानसभा मतदार संघातून माजी महापौर संदीप कोतकर माघार घेणार घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. कोतकर यांनी कोणत्या कारणाने माघार घेतलीय हे मात्र स्पष्ट झालेले नाही.
गेल्या काही दिवसांपासून माजी महापौर संदीप कोतकर यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी चालविली होती. त्या अनुषंगाने प्रचारालाही सुरुवात केली होती. नगर शहरात वातावरण निर्मितीही झाली होती. नगरमध्ये आमदार संग्राम जगताप विरुद्ध माजी महापौर संदीप कोतकर अशीच लढत होईल असे वाटत होते. कोतकर यांचे महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु होते. परंतू, आता माजी महापौर संदीप कोतकर यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.