Wednesday, February 12, 2025

पूजा खेडकरला बनावट प्रमाणपत्र दिलेल्या नगरच्या रुग्णालयातील दोन कर्मचार्‍यांसह चार जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर : पूजा खेडकरला दिव्यंगत्वाची खोटी प्रमाणपत्रे देणाऱ्या अहमदनगर जिल्हा रुग्णालयात अशी खोटी प्रमाणपत्रे देणारे रॅकेट चालत असल्याचं समोर आलंय. अहमदनगर जिल्हा रुग्णालयाकडून याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यापैकी दोन जण रुग्णालयात काम करणारे कर्मचारी आहेत तर चौघांनी अपंगांना मिळणाऱ्या योजनांचा लाभ घेता यावा यासाठी खोटी प्रमाणपत्रे बनवल्याच समोर आलंय. यामुळे अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

जिल्हा रुग्णालयातील अज्ञात कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता, रुग्णालयात नोंद न करता ऑनलाईन पोर्टलवार माहिती भरली. त्याद्वारे कर्णबधीर असल्याचे बनावट अपंग प्रमाणपत्र मिळवल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या चौकशीतून समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, पाथर्डी तालुक्यातील चौघांवर तर दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी (वर्ग एक) डॉ. साहेबराव डवरे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. विशेष म्हणजे या बनवेगिरीच्या साखळीमध्ये जिल्हा सरकारी रुग्णालयातीलच काही कर्मचारी सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रसाद संजय बडे (पाथर्डी), सुदर्शन शंकर बडे (पाथर्डी), सागर भानुदास केकाण (रा. पागोरी पिंपळगाव, पाथर्डी), गणेश रघुनाथ पाखरे (माणिकदौंडी, पाथर्डी) योगेश बनकर (जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी) गणेश गोत्राळ (जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी) या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles