देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात उपस्थिती लावली. या कार्यक्रमात त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या आणि अवधूत गुप्तेंच्या प्रश्नांना तेवढीच दिलखुलास पणे उत्तरं दिली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यातली खुपणारी गोष्ट काय हे सांगितलं आहे. त्यांनी दिलेली ही उत्तरं चर्चेत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी खुपणारी गोष्ट म्हणजे, ते स्वतः खूप काम करतात, परिश्रम करतात आणि सगळ्यांना काम करायला लावतात. त्यात लोक थकून जातात असं गडकरींनी म्हटलं आहे.
अमित शाह हे कायम गंभीर असतात. टेन्शनमध्ये असल्यासारखे वाटतात असं म्हणत त्यांच्यातली खुपणारी गोष्ट काय आहे ते नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे.