या वर्षी 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव आहे. हा भारतात, विशेषत: महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा सण आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या वेळी गणेश चतुर्थीच्या वेळी 300 वर्षांनंतर ब्रह्मयोग आणि शुक्ल योग येणार आहे. त्यामुळे मेष, मिथुन आणि मकर राशीच्या व्यक्तींना या योगांचा फायदा होईल.
मेष राशीच्या व्यक्तींसाठी गणेश चतुर्थी हा लकी कालावधी असेल. या राशींच्या व्यक्तींसाठी मालमत्तेत गुंतवणूक करण्याकरिता हा काळ अतिशय अनुकूल असेल. त्यांच्या व्यवसायात भरभराट होईल आणि प्रलंबित कामंही पूर्ण होतील.
मकर राशीच्या व्यक्तींच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. त्यांच्यासाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत तयार होतील. त्यांच्या व्यवसायाशी संबंधित समस्या आणि इतर प्रलंबित असाइनमेंट्सदेखील पूर्ण होतील.
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठीही गणेश चतुर्थी चांगली राहील. मिथुन राशींच्या व्यक्तींना अमाप संपत्ती मिळविण्यास वाव आहे. त्यांच्या नोकरी आणि व्यवसायातही मोठी वाढ होऊ शकते






