Saturday, January 25, 2025

श्री विशाल गणेश मंदिरात पुष्पवृष्टीत गणेश जयंती साजरी

नगर – श्री गणेश जयंतीनिमित्त शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे श्री गणेश जन्मावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळीच जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी श्री विशाल गणेशाचे दर्शन घेतले. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, विश्वस्त विजय कोथिंबीरे, बापूसाहेब एकाडे, हरिभाऊ फुलसौंदर, रंगनाथ फुलसौंदर, ज्ञानेश्वर रासकर, पांडूरंग नन्नवरे, गजानन ससाणे, चंद्रकांत फुलारी, संजय चाफे, प्रा.माणिक विधाते, नितीन पुंड आदिंसह पुजारी संगमनाथ महाराज उपस्थित होते.

प्रारंभी सकाळी अभिषेक करण्यात आला. भाविकांनी पहाटे पासून रांगा लावल्या होत्या. दुपारी गणेश जन्मवेळी यावेळी भाविकांनी पुष्पसृष्टी केली. भिंगार येथील कु.समृद्धी राजेंद्र राऊत व कु.सारिका राम पांढरे यांनी शंकर-पार्वती-श्रीगणेश परिवाराची आकर्षक अशी रांगोळी काढली. त्यासाठी त्यांना 8 तास लागले. गणेश जयंतीनिमित्त गणेश यागचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे यजमान उद्योजक सुरेश कर्डिले परिवार होता. यावेळी पंकज कर्डिले, पियुष कर्डिले आदि उपस्थित होते. यागाचे पौराहित्य नाशिक येथील मुकुंदशास्त्री मुळे यांनी केले.

यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. गणेश जयंतीनिमित्त मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. देवस्थान ट्रस्टच्यावतीने भाविकांसाठी मंडप, बॅरिगेटस्, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गणेश मंदिरातील सेवेकरी व पोलिस प्रशासन भाविकांच्या गर्दीेचे नियोजन करत होते.

यावेळी देवस्थानच्यावतीने कु.समृद्धी राऊत व कु.सारिका पांढरे यांचा श्री विशाल गणेशाची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles