भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची इच्छा असेल तर गंगाखेड मतदारसंघ त्यांच्यासाठी सोडण्यास मी तयार आहे असे जाहीर वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी केले आहे. पंकजाताई मुंडे जर गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असतील तर मी गंगाखेड विधानसभा मतदारसंघ त्यांच्यासाठी सोडण्यास तयार असल्याचे डॉ. गुट्टे म्हणाले. आमदार रत्नाकर गुट्टे म्हणाले की भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे सांगत आहेत की पंकजा मुंडे यांना मी निवडणुकीत पाडेन. अशा पद्धतीचा अपप्रचार भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून माझ्याविषयी चालू आहे पण मी पंकजाताई मुंडे यांचा आदर करत आहे त्यांनी जर गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा जाहीर केली तर मी गंगाखेड विधानसभा मतदारसंघ त्यांच्यासाठी सोडेन.
पंकजा मुंडेंसाठी विद्यमान आमदार आपला विधानसभा मतदारसंघ सोडण्यास तयार….
- Advertisement -