*
१) मंगळवार दिनांक- १९/९/२३ रोजी श्री गणेश चतुर्थी, गणरायाचे आगमन होणार आहे.
🙏🏼 शुध्द चतुर्थी शुभ नक्षत्र दुपारी १.४५ पर्यंत आहे. पण त्याच दिवशी वैधृती योग संपूर्ण दिवस व विष्टी करण दुपारी १.४४ पर्यंत आहे.हे मात्र अशुभ असलेने त्यांच्या परिहारासाठी काहीच उपाय नाही. म्हणजे गणपती आगमन दुपारी १.४५ पर्यंतच करावे. सूर्योदयापासून सकाळी ९.३० पर्यंत रोग व उद्वेग ह्या दोन चौघडी अशुभ आहेत. त्यानंतर मात्र ९.३० ते १.४५ अखेर चंचल, लाभ अमृत या तीन चौघडी शुभ आहेत. म्हणून *सकाळी ९.३० ते दुपारी १.४५ पर्यंत* गणपती आणावेत.
२) गुरुवार दिनांक २१-९-२३ रोजी गौरी आणण्यासाठी अनुराधा नक्षत्र असावे लागते.
👏🏼 ते दुपारी ३.४५ पर्यंत आहे पण दुपारी १.३० ते ३ राहू काळ असलेने गौरी *सूर्योदयापासून दुपारी १.३० पर्यंतच* आणावे.
३) शनिवार दिनांक २३-९-२३ रोजी गणपती, गौरी विसर्जन आहे. *मूळ नक्षत्र दुपारी २.५६ पर्यंत* आहे.त्या वेळेत विसर्जन करावे किंवा त्यावेळेस मूर्ती हलवून ठेवावी. व नंतर आपल्या सोयीने गणपती गौरीचे विसर्जन करावे.
*शुभं भवतु*
(सोशल मीडियावरील व्हायरल पोस्ट)