गणपती मिरवणूक संदर्भातील एक जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “मिरवणूकीत डान्स करण्यासाठी अर्जंट माणसं हवी अशी ही जाहिरात आहे. या जाहिरातीवर नेटकरी गंमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत.
ही जाहिरात @PuneriSpeaks या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आली आहे. “गणपती बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यात नाचण्यासाठी १८ ते ३० वयोगटातील माणसं हवी” अशी ही जाहिरात आहे. ही विसर्जन मिरवणूक येत्या २७ सप्टेंबरला असून नाचणाऱ्यांना ३०० रुपये दिले जातील असा दावा या जाहिरातीत करण्यात आला आहे. शिवाय इच्छूकांसाठी फोन नंबर देखील देण्यात आला आहे.