Thursday, March 20, 2025

नगर तालुक्यातील ‘या’ गावात ग्रामस्थ साकारणार मिनी फॉरेस्ट , 430 वृक्षाची लागवड

रेसिडेन्सीअल हायस्कूलचे माजी प्राचार्य श्रीधर पवार यांच्या स्मरणार्थ पिंपळगाव कौडा येथे 430 वृक्षाची लागवड

पिंपळगाव कौडा ग्रामस्थ साकारणार मिनी फॉरेस्ट

नगर : तालुक्यातील पिंपळगाव कौडा गावामध्ये रेसिडेन्सीअल हायस्कूलचे माजी प्राचार्य व गावचे माजी सरपंच श्रीधर पवार यांच्या स्मरणार्थ गेल्या पाच वर्षापासून वृक्षारोपणाची लोकचळवळ हाती घेऊन पर्यावरण संतुलनासाठी ग्रामस्थ सरसावले आहे या माध्यमातून यावर्षी विविध जातीचे 430 वृक्षाची लागवड करण्यात आली आहे.
नगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा येथील सरपंच व रेसिडेन्सीअल हायस्कूलचे माजी प्राचार्य श्रीधर पवार यांच्या स्मरणार्थ पवार कुटुंब, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर व ग्रामस्थ यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले यावेळी न्यूरो फिजिशियन गौतम काळे, रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे अजय पिसुटे, मर्लिन इलीशा, निर्मल खंडेलवाल, सुधा खंडेलवाल, विजय निकम, प्रियांका पिसुटे, डॉ. सचिन वहाडणे, डॉ विनोद मोरे, तुषार देशमुख, अभिषेक शेलार, अमोल खोले. सारिका मोरे , सरपंच बाळासाहेब शिंदे, उपसरपंच विनायक पवार, माजी सरपंच संभाजी पवार, न्यायाधीश जयसिंग पवार, मुख्याध्यापक पोपट पवार, शेषराव दळवी, डॉ.राहुल पवार, यांच्यासह पिंपळगाव कौडा ग्रामस्थ आणि पवार कुटुंबीय आदी उपस्थित होते.

कै. श्रीधर पवार यांच्या कुटुंबीयांच्या वतीने आपल्या मूळ गावी सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत वृक्षारोपणाची संकल्पना राबवली जात असून यावर्षी जपान मधील प्रसिद्ध अशीमिया वाकी म्हणजे मिनी फॉरेस्ट यात कमी जागेत जास्त वृक्ष लावली जाते, आज 1600 स्क्वेअर फुट जागेत 430 झाडे लावली आहे यात वड, पिंपळ, करंज, बहावा, यासह विविध जातीची वृक्ष लावली असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे अजय पिसूटे यांनी दिली

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles