गरबा हा नवरात्रोत्सवातील एक महत्त्वाचा नृत्यप्रकार आहे. देवीच्या मंडपात नऊ दिवस गरबा महोत्सव साजरा केला जातो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण गरबा खेळताना दिसून येतात.
या व्हायरल व्हिडीओमध्ये सुद्धा एक वयोवृद्ध महिला उत्साहाने गरबा खेळताना दिसत आहे. तरुणींबरोबर ती गरबा खेळत आहे. आजीच्या गरबा खेळतानाचे डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
उतार वयातही आजी तितक्याच उत्साहाने आणि ऊर्जेने गरबा खेळत आहे. गरबा खेळायची आजीची आवड खरंच अनेकांना प्रेरित करणारी आहे.