अहमदनगर मनपा कर्मचाऱ्याचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न लागू करावा यासाठी पाचव्या दिवशीही उपोषण सुरू
मनपा कर्मचाऱ्यांचे सोमवारपासून बेमुदत संप – आनंद वायकर
मनपा सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन ; शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग
नगर : अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी कर्मचारी युनियनच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण सुरू केले असून आज पाचव्या दिवशी सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्यामुळे शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग पहावयास मिळत आहे, राज्य सरकारने येत्या दोन दिवसात सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी न लागल्यास सोमवारपासून मनपा कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा या वेळी दिला, पाचव्या दिवशी उपोषण करते बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, बाबासाहेब राशिनकर यांची तब्येत ढासळत चालली असून डॉक्टरांच्या वतीने सलाईन घेण्याची विनंती केली आहे, मात्र उपोषणकर्त्यांनी नाकारली आहे, जोपर्यंत सातवा वेतन आयोग लागू होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही या भूमिकेवर ते ठाम आहेत
अहमदनगर मनपा कर्मचाऱ्याचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न लागू करावा यासाठी पाचव्या दिवशीही उपोषण सुरू असून यावेळी भाजपाचे अध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, भाजपच्या महिला अध्यक्ष प्रिया जाधव, सावेडी मंडलाध्यक्ष नितीन शेलार, माजी सभागृह नेते रवींद्र बारस्कर, भैय्या गंधे,डॉक्टर सतीश राजूरकर, आनंद वायकर मेहर लहारे, बाळासाहेब गायकवाड, गीता गिल्डा, रामदास आंधळे, गोपाळ वर्मा, दत्ता गाडळकर, मनोज ताठे, अरुण शिंदे, राजेंद्र सातपुते, बाबासाहेब सानप आदी उपस्थित होते.
मनपा कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी मार्गी लागावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी भेट घेणार आहे यामध्ये पक्षी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येत कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे, मनपा कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, कर्मचाऱ्यांना उपोषण करण्याची वेळ येऊ दिली नव्हती पाहिजे महापालिका कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गे लावण्यासाठी यापूर्वी देखील प्रयत्न केले आहे: तरी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण मागे घ्यावे ही विनंती भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी केली
मनपा कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी सफाई कर्मचाऱ्यांनी स्वतःहून काम बंद आंदोलन केले, मात्र आम्ही त्यांना कामावर जाण्यास सांगितले असून सोमवार पर्यंत हा प्रश्न मार्गी न लागल्यास मनपाचे सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहे, आता कर्मचाऱ्यांनीच आंदोलन हाती घेतले असून ते ऐकायला तयार नाहीत कर्मचाऱ्यांचा प्रश्न रास्त असून महागाईच्या काळामध्ये मार्गी लागणे गरजेचे आहे, ज्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार दोन-दोन, तीन-तीन महिने होत नाही, त्या महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळत आहे, आमदार संग्राम जगताप व भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी राज्य सरकारकडे कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा केला आहे ,येत्या सोमवारपासून महापालिका कर्मचारी पाणीपुरवठा आरोग्य विभाग, दवाखाने, स्वच्छता, स्ट्रीट लाईट बंद ठेवणार असल्याची माहिती युनियनचे सचिव आनंद वायकर यांनी दिली.