एका मोठ्या आकाराच्या गरुडाने चक्क एका कोल्ह्याची शिकार केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.गरुड हा चाणाक्ष आणि चपळ शिकारी म्हणून ओळखला जातो. कोल्ह्याची शिकार केल्यानंतर त्याला पंजांमध्ये धरुन हा गरुड डोंगराच्या कठड्यावर बसल्याचं दिसून येत आहे. अचानक हा गरुड या पूर्णपणे वाढ झालेल्या कोल्ह्याला पंजांमध्ये घेऊन आकाशात झेप घेतो. हा गरुड जेव्हा उडतो तेव्हा त्याच्या दोन्ही पंजांनी त्याने या मेलेलेल्या कोल्ह्याला घट्ट पकडलं आहे. गरुड झेप घेतो त्यावेळी या कोल्ह्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसत आहे.
Nature is brutal 😲 pic.twitter.com/2qDjt15KaC
— Terrifying Nature (@TerrifyingNatur) May 22, 2023