तुम्ही चहा पावडरचा वापर चहा बनवण्यासाठी केला असेल पण कधी सिलेंडरवर चहापत्ती टाकली आहे का? नाही ना…मग एकदा सिलेंडरवर चहा पावडर नक्की टाकून पाहा. सिलेंडरवर चहा पावडर टाकून अशी कमाल की तुम्ही विचारही केला नसेल. एकदा तुम्ही हा उपाय पाहिलात तर दररोज कराल.यासाठी एका गृहिणीने किचन जुगाड दाखवला आहे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. स्वयंपाकघरात सिलेंडर जिथे ठेवले जाते, त्या ठिकाणी घाणेरडे गंजाचे डाग तयार होतात. सिलिंडरच्या डागामुळे स्वयंपाकघरातील फरशी अस्वच्छ दिसते. मात्
गृहीणीनं दाखवलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका भांड्यात चहा पावडर घ्या आणि अर्धा ग्लास पाणी टाकून उकळून घ्या. उकळी यायला लागल्यावर त्यात एक चमचा मीठ टाका आणि गॅस बंद करुन ते व्यवस्थित मिक्स करुन घ्या. यानंतर ते थंड होऊद्यात, थंड झाल्यावर हे पाणी गाळून घ्या. गाळून घेतलेल्या पाण्यात आता दोन चमचे फिनायल टाका. आता सिलेंडरमुळे ज्या ठिकाणी डाग पडले आहेत त्याठिकाणी हे पाणी स्प्रे करा. यानंतर जादू बघा काही वेळातच हे डाग नाहिसे होतात.