Monday, July 22, 2024

केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलं मोठं गिफ्ट,गॅस सिलिंडरच्या दरात कपात

तेल विपणन कंपन्यांनी पहाटे ६ वाजता गॅस सिलिंडरचे नवे दर जाहीर केले. त्यानुसार, एलपीजी सिलिंडर जवळपास ३१ रुपयांनी स्वस्त झाला आहे. आज पहाटेपासूनच नवीन दर लागू करण्यात आले आहेत. यामुळे महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे.

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवीन दर जारी केले जातात. आजपासून जुलै महिना सुरू झाला असून पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली. १९ किलो वजनाचा व्यावसायिक सिलिंडर जवळपास ३० ते ३१ रुपयांनी स्वस्त झाला. त्यामुळे आता मुंबईत व्यावसायिक सिलिंडरची किंमत १५९८ रुपये इतकी झाली आहे.

तर दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर आता १६४६ रुपयांना मिळणार आहे. चेन्नईमध्ये आजपासून व्यावसायिक सिलिंडर १८४०.५० रुपयांऐवजी १८०९.५० रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ३१ रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे सिलिंडरचे दर १७५६ रुपये इतके झाले आहेत.व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सलग चौथ्या महिन्यात घट झाली आहे. या कालावधीत चारही महानगरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर तब्बल १५० रुपयांनी स्वस्त झाला आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाहीत. ९ मार्चपासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर जैसे थे आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles