दोन मध्यम आकाराच्या दोन बॉटल घ्यायच्या आहेत. या बॉटलचा पुढचा भाग कापायचा आहे, त्यानंतर उरलेला भाग घेऊन तो गॅसच्या बर्नवर उलटा ठेवायचा आहे. यामुळे कोणतीही घाण, अन्न या बर्नरमध्ये जाणार नाही. नेहमी पाहिलं असेल बर्याचदा बर्नर नीट पेटत नाही. बर्नरची छिद्रे ब्लॉक झालेली असतात. त्यामुळे बर्नरच्या बाजूने गॅस बाहेर पडतो. सिलेंडरमधून गॅस निघूनही बर्नर मधून तो वाया जातो. त्यामुळे गॅस लवकर संपतो. पण हा उपाय केल्याने बर्नर वरील छिद्र मोकळी होतील आणि गॅस छिद्रातूनच बाहेर पडेल. यामुळे गॅसचीही बचत होईल गॅस लवकर संपणार नाही, असा दावा या गृहिणीने केला आहे.
- Advertisement -