महायुती सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार नेहमी आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत असतात. यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठते. आता पुन्हा एकदा अब्दुल सत्तार नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत. यामागचे कारणही तसेच आहे. १ जानेवारीला सत्तार यांचा वाढदिवस होता.
वाढदिवसाचं सेलिब्रेशन धुमधडाक्यात व्हावं, यासाठी मंत्रीमहोदयांनी सिल्लोड शहरात गौतमी पाटील हिच्या डान्सचा कार्यक्रम ठेवला. यासाठी मोठी पोस्टर्सबाजी देखील करण्यात आली. गौतमीचा कार्यक्रम म्हटल्यानंतर खेड्यापाड्यातून अनेक तरुणांनी सिल्लोड येथे गर्दी केली.
दरम्यान, गौतमीचा कार्यक्रम सुरू होताच तरुणांनी नेहमीप्रमाणे हुल्लडबाजी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे कार्यक्रम मध्यस्थीच बंद पडला. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार तरुणांवर चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना मंत्री अब्दुल सत्तार यांनी भरस्टेजवरुन शिवीगाळ केली…#AbdulSattar #GautamiPatil #Sillod #Maharashtra pic.twitter.com/pXOAQHyOv6
— Satish Daud Patil (@Satisdaud0705) January 4, 2024