सबसे कातील म्हटलं की आता लगेचच ओठांवर गौतमी पाटील हे नाव येतं. आपल्या डान्सने गौतमीनं भल्याभल्यांना भुरळ घातलीये. गौतमीच्या डान्सचे आजवर अनेक व्हिडीओ व्हायरल झालेत. राज्यात गौतमीप्रमाणे डान्स करणारे अनेक कलाकार आहेत. मात्र गौतमीनंच आख्खं मार्केट जाम केलंय. अशात सोशल मीडियावर गौतमीलाही तोड मिळेल असा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
तरुणांनी चंद्रा ही लावणी सादर केली आहे. मरिन ड्रईव्ह परिसरात या तरुणांनी डान्स केलाय. म्युजीकसह या गाण्याचे बोल जसे आहेत अदगी तसेच दोघेही डान्स करतायत. तरुणांनी डान्स करताना त्यांच्यासमोर गौतमी पाटील देखील फिकी आहे असं काही नेटकऱ्यांनी म्हटलंय. मरिन ड्राईव्हवर तरुणांचा डान्स पाहण्यासाठी तेथे साऱ्यांनीच गर्दी केली होती.
Video: या दोघांनी तर गौतमीलाही मागे टाकलं, तरुणांचे लावणीवर ठुमके…
- Advertisement -