‘सबसे कातील गौतमी पाटील’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी गौतमी पाटील सध्या चांगलीच चर्चेत आले. गौतमी पाटील आपल्या अदा आणि नृत्याच्या तालावर संपूर्ण महाराष्ट्राला नाचायला लावते. गौतमीची एक झलक पाहण्यासाठी राज्यभरातील तरुण तिच्या डान्स शोला मोठी गर्दी करताना दिसतात. गौतमी पाटील फक्त डान्सचे कार्यक्रम करत नाही तर तिचे अनेक गाणी देखील युट्युबवर आतापर्यंत प्रदर्शित झाले आहे. अशामध्ये आता ‘दिलाचं पाखरू’नंतर गौतमी पाटीलचं आणखी एक गाणं रिलीज झाले आहे. गौतमीचे ‘घोटाळा’ हे गाणं सध्या रिलीज झालं असून ते सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
गौतमी पाटीलचे ‘घोटाळा’ हे नवं गाणं नुकताच रिलीज झाले आहे. ‘Being Filmy Creations’ या यूट्यूब चॅनेलवर तिचे हे नवं कोरं गाणं शेअर करण्यात आले आहे. गौतमी पाटीलच्या या गाण्यातील लूक आणि कातील अदांनी तर सर्वांना वेड लावलं आहे. तिच्या या गाण्याला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. या यूट्युब चॅनेलने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर देखील हे गाणं शेअर केले आहे
Video: ‘सबसे कातील गौतमी पाटीलच्या ‘घोटाळा’चा सोशल मीडियावर धुमाकूळ
- Advertisement -