गेल्या काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलच्या ‘घुंगरू’ या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. या सिनेमाच्या माध्यमातून नृत्यांगणा गौतमी अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. पण आता तिच्या पहिल्या-वहिल्या सिनेमाच्या प्रदर्पुशनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
घुंगरू’ या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन बाबा गायकवाड यांनी केलं आहे. त्यामुळे रिलीज डेट पुढे ढकलण्याबाबत बाबा गायकवाड म्हणाले,”काही कारणाने ‘घुंगरू’ या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील आठ दिवसांत ‘घुंगरू’ सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात येईल”.