Monday, March 4, 2024

video: तरुणाने चक्क गौतमी पाटीलची ऑफर रिजेक्ट केली? काय आहे हा प्रकार…

सोशल मीडियावरसुद्धा सतत गौतमी पाटीलच्या नावाचा जलवा पाहायला मिळत असतो.आपल्या डान्स आणि अदांमुळे नेहमीच गौतमी पाटील सध्या यशाच्या शिखरावर आहे. मात्र, एकदोन दिवसात तिच्या कार्यक्रमाची बातमी झाली नाही असं होत नाही. काही ना काही कारणांमुळे गौतमीचा कार्यक्रम चर्चेत येत असतो. गौतमीचे फॅन्स गल्ली बोळातही सहज सापडतील. असं असतानाही एका तरुणानं चक्क गौतमी पाटीलची ऑफर रिजेक्ट केलीय. व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हसून हसून लोटपोट व्हाल.
व्हिडीओमध्ये गौतमीने दिलेली ऑफर एका तरुणाने रिजेक्ट केल्याचं दाखवण्यात आलंय. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गौतमी मी येत आहे तुम्ही पण या असं म्हणत आहे. त्यावर या तरुणाने व्हिडीओ एडिट करून नको नको असं म्हणत स्वत:चा व्हिडीओ तेथे पोस्ट केला आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडीओ पाहिल्यावर गौतमीची ऑफर त्याने रिजेक्ट केल्याचं वाटतंय. हल्लीची तरुणाई एवढी क्रिएटीव्ह आहे की कधी कधी हे खरंच आहे असं वाटतं. हीच तरुणाई आपली क्रिएटीव्हिटी सोशल मीडियावर शेअर करते आणि ते व्हिडीओ व्हायरल होतात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles