Saturday, January 25, 2025

गौतमी पाटीलनं ‘लिंबू फिरवला’, नव्या गाण्यांची चाहत्यांना भुरळ….व्हिडिओ

नृत्यांगणा गौतमी पाटील नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. गौतमी पाटील आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गौतमी पाटीलचं नवं गाणं रिलीज झालं आहे. गौतमी पाटील ‘लिंबू फिरवला’ गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आगामी लाईक आणि सबस्क्राईब चित्रपटातील ‘लिंबू फिरवला’ हे पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यातून गौतमी पाटील एका नव्या अवतारात पाहायला मिळत आहे.

लाईक आणि सबस्क्राईब चित्रपटातील लिंबू फिरवला हे आयटम साँग प्रदर्शित करण्यात आलं आहे. रिलीज होताच या गाण्याची चर्चा पाहायला मिळत आहे. वैशाली सामंत हिच्या आवाजातील हे गाणं फारच ट्रेंडमध्ये आलं आहे. वैशाली सामंतच्या आवाजाची जादू आणि गौतमी पाटीलचे ठुमके यांचा संगम या गाण्यात पाहायला मिळत आहे. अमितराज याने हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. या गाण्यात गौतमी पाटीलसोबत अभिनेता अमेय वाघही डान्स करताना दिसत आहे.

नव्या गाण्यांची चाहत्यांना भुरळ
काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपटाचे पोस्टर झळकले होते. ‘लाईक आणि सबस्क्राईब’ असं नाव असलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अमृता खानविलकर, अमेय वाघ आणि जुई भागवत झळकणार आहेत. ‘तुमची मुलगी काय करते?’ या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारणारी जुई भागवत ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. जुई भागवत एक उत्तम नर्तिका आणि गायिका असून आता ती चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles