गौतमी पाटील ही तिच्या नृत्यानं प्रेक्षकांची मनं जिंकते. गौतमीच्या अदा आणि तिचा डान्स हा प्रेक्षकांना घायाळ करतो. सध्या गौतमी ही तिच्या एका नव्या गाण्यामुळे चर्चेत आहे. गौतमीचं “दिलाचं पाखरू” हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. “दिलाचं पाखरू” या गाण्यात गौतमीचा रोमँटिक अंदाज तिच्या चाहत्यांना बघायला मिळत आहे.
गौतमी पाटीलचं “दिलाचं पाखरू” हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आलं. हे गाणं धुरंधर, निधी हेगडे, स्वराज थिटे यांनी गायले आहे. या गाण्याचा गीतकार धुरंधर हा आहे. तर त्यानेच या गाण्याची संगीत रचना केली आहे.
“दिलाचं पाखरू” या गाण्यात गौतमी ही घोडेस्वारी देखील करताना दिसत आहे. “दिलाचं पाखरू” या गाण्याचा व्हिडीओ गौतमीनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच धुरंधर या युट्यूब चॅनलवर “दिलाचं पाखरू” हे संपूर्ण गाणं शेअर करण्यात आलं आहे.