तीनवेळा गौतमी पाटील हिच्या डान्सचा उल्लेख केला. एका शाळेच्या मैदानात गौतमीचा डान्सचा कार्यक्रम झाला होता. त्यावर नाराजी व्यक्त करताना शरद पवार यांनी हा उल्लेख केला. शरद पवार यांनी शाळेच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमावर नाराजी व्यक्त केल्याने त्यावर गौतमी पाटील काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. नवी मुंबईत कार्यक्रमानिमित्त आलेल्या गौतमीला याबाबत विचारण्यातही आलं…
गौतमी पाटील हिचा पनवेलमधील वांवजे येथे अंकित वर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गौतमी पाटील हिला मीडियाने गाठलं. मीडियाने गौतमीला शरद पवार यांच्या प्रतिक्रियेबद्दल विचारलं. त्यावर तिने बोलण्यास नकार दिला. मी शरद पवार यांच्याबद्दल काहीच बोलणार नाही, असं गौतमी पाटीलने म्हटलं आहे. गौतमी पाटील ही नेहमीच राजकीय नेत्यांच्या विधानावर प्रतिक्रिया देणं टाळते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही गौतमीवर टीका केली होती. त्यावरही तिने प्रतिक्रिया दिली नव्हती. आताही तिने शरद पवार यांच्या विधानावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
मी तर…
गौतमी पाटील हिच्या पनवेल येथील कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी नव्हती. तरीही हा कार्यक्रम झाला. त्यावरही तिने प्रतिक्रिया व्यक्त केली. मी गेस्ट म्हणून आले होते. माझा परफॉर्मन्स नव्हता, असं गौतमीने स्पष्ट केलं. मागच्यावेळी मुंबईतील तिच्या कार्यक्रमात युवकांनी गोंधळ घातला होता. खुर्च्या फेकल्या होत्या. त्यावरही तिने भाष्य केलं. शांततेत कार्यक्रम पार पडावा असं आवाहन मी सदैव करत असते. पण ज्यांना गडबड करायची त्यांनी माझ्या कार्यक्रमाला येऊ नये, असं ती म्हणाली.
आली पण…
दरम्यान, पनवेल तालुका पोलिसांनी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. मात्र, तरीही ती पनवेलमध्ये आली होती. वाढदिवसाच्या या कार्यक्रमात ती पाहुणी म्हणून आली होती. यावेळी तिने नृत्याचा कार्यक्रम केला नाही. लोकांशी संवाद साधला. फक्त एका गाण्यावर थोडावेळ ठेका धरला होता.
आम्ही म्हणालो म्हणून…
माझ्या मित्राचा साधा वाढदिवस होता. या वाढदिवसाला गौतमी पाटील पाहुणी म्हणून आली होती. कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मागच्यावेळी कामोठेमध्ये तरुणांनी गोंधळ घातला होता. त्यामुळे आमची परवानगी नाकारली गेली. तरीही गौतमीने एका गाण्याच्या मुखड्यावर थोडावेळ ठेका धरला. ज्यावेळी एखादा कलाकार कार्यक्रमाला येतो. तेव्हा त्याला फर्माईश केली जाते. तशी फर्माईश आम्हीही केली. त्यामुळे गौतमीने थोडावेळ ठेका धरला, अशी माहिती वांवजे गावचे सरपंच धनराज बाळाराम म्हात्रे यांनी दिली.