डान्सर गौतमी पाटील ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर सक्रिय आहे. ती अनेकदा तिच्या डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. आता तिने तिच्या डान्सचा असाच एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. पण या व्हिडीओवर युजर्स कमेंट करून तिला ट्रोल करत आहेत.
गौतमी पाटीलने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये ती ‘दिलदार मनाचा रुबाबदार’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओत तिच्याबरोबर तीन लहान मुली देखील याच गाण्यावर डान्स करतात. त्याही मंचावर गौतमीबरोबर तिच्याप्रमाणेच डान्स करताना दिसतात. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी गौतमीवर टीका केली आहे.