गौतमी सोशल मीडियावर सक्रिय असून ती नेहमी तिचे फोटो व्हिडीओ शेअर करत असते. सोशल मीडियावर नेहमी तिच्या नृत्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. गौतमीचे नृत्य पाहण्यासाठी प्रेक्षकांचे गर्दी होत आहे. अनेकदा स्टेजवर तिच्या नृत्याने तरुणाईला घायाळ करताना दिसते. कधी महिलांसह तर कधी चिमुकल्यांसह ती नाचताना दिसते. सध्या अशाच एका चिमुकलीसह नृत्य करताना गौतमी पाटीलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, गौतमी स्टेजवर नृत्य करत आहे तेवढ्यात एक मुलगी धावत येते आणि गौतमीला मिठी मारते. चिमुकल्या चाहतीचे प्रेम पाहून होणारा आनंद गौतमीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो आहे. ती तिच्या चाहतीला मिठी मारते आणि तिच्यासह नृत्य करते. गौतमीच्या शैलीमध्ये ही चिमुकलीदेखील नाचताना व्हिडीओमध्ये दिसते आहे.






