आम्हाला नोकरी नाही मिळाली, तरी आम्हाला कमीत कमी शिक्षण मिळते म्हणून आम्ही निर्धास्त असतो. उद्या तुमचे हे कंत्राटी लोक येतील आणि गौतमी पाटीलचे कार्यक्रम शाळा, महाविद्यालयात सुरू करतील अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजप सरकारला घरचा आहेर दिला
नांदेड येथील शेतकरी मेळाव्यात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील उपस्थित होते. विखे पाटील यांच्या समोरच सूर्यकांता पाटील यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले.
शिक्षक आणि पोलिस खात्यात कंत्राटी भरती अजिबात झाली नाही पाहिजे असं आमचं मत आहे. आम्ही आधीच बेजार आहोत. उपाशी तापाशी राहून आमचे मायबाप आम्हला शिक्षण देत आहेत. दरम्यान शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षा ही सरकारची जवाबदारी आहे. परंतु शिक्षकाचीही कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. कंत्राटी भरती केल्यास शाळा शाळांमध्ये उद्या गौतमी पाटील नाचेल असे ही पाटील म्हणाल्या.
कंत्राटी भरती केल्यास शाळांत गौतमी पाटील नाचेल; माजी केंद्रीय मंत्र्यांचा भाजपला घरचा आहेर
- Advertisement -