आपल्या नृत्य आणि अदांनी वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलला कोण ओळखत नाही. गौतमी पाटील ही नृत्यांगणा आहे जी अत्यंत लोकप्रिय आहे. पाव्हणं जेवला काय, पाटलाचा बैलगाडा, मी पाटलाची लेक अशा गाण्यांवर जबरदस्त डान्स करून तिने चाहात्यांच मन जिंकले आहे. ” “सबसे कातिल गौतमी पाटील” असे तिचे चाहते म्हणतात. दरम्यान गौतमी पाटीलने होळी निमित्त चाहत्यांना खास सरप्राईज दिले आहे. गौतमीने होळी साजरी करतानाचे तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत जे पाहून चाहते खुश झाले आहेत.
गौतमीने पांढऱ्या रंगाची ऑर्गेंन्झा साडी नेसली आहे. या साडीवर काळ्या रंगाचा कॉन्ट्रॉस्ट ब्लाऊज परिधान केला आहे. तिने केस मोकळे सोडले आहेत आणि मिनिमल ज्वेलरी परिधान केली आहे. गौतमी कपाळावर छोटीशी काळी टिकली लावली आहे ज्यामुळे तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे. गौतमी गालावर लाल रंग लावलेला दिसत आहे. तिचा हा लूक चाहात्यांना घायाळ करत आहे.