जालन्यातील अंतरवाली सराटीत झालेल्या लाठीचार्जचे आदेश गृहमंत्री फडणवीसांनी दिले नव्हते तर तो मधला माणूस कोण आहे हे शोधलं पाहिजे, लाठीचार्ज करणारा कोण हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी शोधून काढावे अशी मागणी मनोज जरांगे यांनी केलीये.. तसंच जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधीक्षकपदी बढती करण्यात आली यावरही मनोज जरांगे यांनी टीका केलीये..