बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुख आणि मानव कौल स्टारर ‘ट्रायल पीरियड’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. तिच्या ‘वेड’ सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. आता जिनिलिया नवा सिनेमा घेऊन येते आहे. शुक्रवारी या विनोदी सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. जिओ सिनेमावर येणाऱ्या या चित्रपटात जिनिलिया एका आईच्या भूमिकेत दिसतेय, तर तिचा मुलगा तिच्याकडे एक विचित्र मागणी करताना दिसतो. सिंगल मदर असणाऱ्या या आईकडे तिचा मुलगा नवीन वडिलांची मागणी करतो. मुलाच्या मागणीपुढे या आईची डाळ काही शिजत नाही आणि शेवटी ती तिच्या लेकासाठी नवीन वडील आणण्याचं ठरवते.
- Advertisement -