शिवसेना ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन नाराज असल्याची चर्चा आहे. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिवसेनेतील एन्ट्रीमुळे त्यांची अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे जर वाकचौरे यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली तर काय? या पर्यायांचा चाचपणी बबनराव घोलप यांनी सुरु केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
बबनराव घोलप यांनी वंचित बहुचन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. त्यामुळे नाराज बबनराव घोलप वेगळ वाट धरतात का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे बबनराव घोल यांचे सुपूत्र योगेश घोलप यांनी देखील राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली आहे
योगेश घोलप शरद पवार यांची भेट घेतल्याने नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विद्यमान आमदार सरोज अहिरे यांचं देखील टेन्शन वाढलं आहे. योगेश घोलप देवळाली मतदासरांघाचे माजी आमदार आहेत
राष्ट्रवादीतील फुटीनंतर राष्ट्रवादीच्या आमदार सरोज आहिरे यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शरद पवारांना या मतदारसंघात आपल वर्चस्व टिकवण्याचे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार योगेश घोलप यांची भेट महत्त्वाची आहे.
योगेश घोलप पुन्हा राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. शरद पवार गटाकडून सरोज अहिरे यांना पर्याय म्हणून योगेश घोलप यांचा विचार होण्याची शक्यता आहे