Monday, March 4, 2024

Video: चपाती लाटता लाटता चपाती फाटली, पोरीने सुई धाग्याने शिवून काढली

मुलगी म्हटल्यावर तिला जेवण बनवता येणं गरजेचं आहे, असं आजही काही अपवाद सोडले तर प्रत्येक कुटुंबात म्हटलं जातं. मुलगी वयात आल्यावर घरी आई तिला आधी चपात्या लाटायला शिकवते. सासरी गेल्यावर त्रास नको म्हणून आधीच शिकून घे असं ही समजावून सांगते. मात्र आजकाच्या मुलींना या सर्व गोष्टी अजिबात आवडत नाहीत. अशात नवीन नवीन चपाती लाटताना प्रत्येक मुलीची पहिल्या चपातीबरोबर एक स्टोरी असते. सध्या सोशल मीडियावर एक तरुणी आणि तिची चपाती यांच्यातली एक स्टोरी तुफान व्हायरल झाली आहे
सोशल मीडियावर चपातीचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ तुम्ही पाहू शकता. या व्हिडीओमध्ये एक तरुणी तिच्या घरी चपाती लाटताना दिसत आहे. आता चपातीसाठी गव्हाचं पीठ वापरलं जातं. त्या पिठाला सुक्क पीठ लावून चपाती लाटावी लागते. नाही तर पीठ पोळपाट आणि लाटण्याला चिकटून बसतं. आता या तातडीने चपाती बनवताना सुकं पीठ वापरलं, मात्र तिने चपाती मध्यभागी जास्तच लाटली. त्यामुळे तव्यावर टाकण्यासाठी तिने चपाती उचलली तेव्हा ती मध्येच फाटली.
आता चपातीमध्ये फाटल्यावर ती परत गोल कशी करायची असा प्रश्न तिच्या मनात येतो. त्यामुळे ती आपली शक्कल लढवते आणि सुई धागा घेऊन येते. सुई धाग्याने ती फाटलेली चपाती शिवून काढते. त्यानंतर तव्यावर भाजून गरमागरम चपाती रेडी करते. तरुणीचा चपातीचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles