देशात असे अनेक लोक आहेत जे त्यांच्या अप्रतिम कलांसाठी ओळखले जातात. तसेच’गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नावाची नोंद होणे खूप मोठी बाब आहे. यासाठी फार मेहनत घ्यावी लागते. ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नावाची नोंद होण्यासाठी जगभरातील लोक स्वत:ताचा जीवही धोक्यात घालतात.त्यासंबंधित अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहत असतो.
त्यातील काही व्हिडिओत व्यक्ती गंभीर जखमी होतात तर काहींना जीवही गमवावा लागतो. अशात सोशल मीडियावर एका केरळमधील तरुणींचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात या तरुणीने तब्बल १४० भाषांमध्ये गाणं गायल आहे.गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव बनवलेल्या तरुणींचे नाव सुचेचा सतीश असे आहे. ती केरळमध्ये रहिवासी आहे. दुबई येथील यूएई येथे आयोजित केलेल्या एका कॉन्सर्टमध्ये या तरुणींने हा विश्वविक्रम केला आहे. संबंधित कार्यक्रम २४ नोव्हेंबर २०२३ रोजी झाला होता.
Video: तरुणींनी गायल १४० भाषांमध्ये गाणं…जगभरात चर्चा सुरू
- Advertisement -