रस्त्यावरून गाडी चालविताना असताना काळजी घेणे गरजेचे आहे. भरधाव रस्त्यावर स्टंट करताना तरूणींचा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताचा व्हिडिओ उत्तराखंड पोलिसांनी त्यांच्या X अकाउंटवर शेअर केला आहे. या तरूणी विनाहेल्मेट स्कुटीवरून प्रवास करत होत्या. तसंच त्या बाजूने जाणाऱ्या बाईक रायडर्ससोबत स्टंटबाजी करत असल्याचं पाहायला मिळतंय.
भरधाव वेगात सुसाट धावत या तरूणी बाईक राईडर्ससोबत स्टंट करत होत्या. परंतु त्यांना हा स्टंट चांगलाच महागात पडल्याचं दिसत आहे. भरधाव वेगामुळे त्यांचे स्कुटीवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे त्यांची गाडी खाली पडली. वेगामुळे त्या दोघीही गाडीसह फरफटल्या गेल्या. हा व्हिडिओ एका प्रवाशाने त्याच्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.
https://x.com/uttarakhandcops/status/1796841365646561646?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1796841365646561646%7Ctwgr%5E844dd13e443ed1c680b31dea51020bbab042c404%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsaamtv.esakal.com%2Fviral-videos%2Froad-accident-video-girls-stunt-on-scooty-video-viral-rsg99