मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात आता मोठी बातमी आहे. मुंबईत मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर आंदोलनाचा इशारा देखील आंदोलकांनी दिला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी देखील त्यांनी केलीय. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या, या मागणीसाठी आता मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झालाय.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आता मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झालाय. यावेळी मनोज जरांगे पाटलांनी राज ठाकरे यांच्यावर देखील हल्लाबोल केलाय. राज्यातील वरिष्ठ नेते शरद पवार यांनी देखील याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, यासाठी ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसत आहे. आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला कोणतं नवीन वळण मिळतं, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान आता मराठा आंदोलकांनी फडणवीसांच्या बंगल्यावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिलाय.