गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स या इलेक्ट्रिक दुचाकी व तीनचाकीच्या इब्लू श्रेणीच्या उत्पादक कंपनीने आज इब्लू फिओ आणि इब्लू फिओ एक्स या ईव्ही दुचाकी श्रेणीवर स्पेशल मान्सून ऑफरची घोषणा केली. ग्राहक 10,000 रूपयांच्या विशेष सूटचा आनंद घेऊ शकतात, ज्यामुळे कंपनीच्या इलेक्ट्रिक दुचाकी इब्लू फिओ एक्स आणि इब्लू फिओची किंमत मूळ किंमत 99,999 रूपये एक्स-शोरूमवरून 89,999 रूपये एक्स-शोरूमपर्यंत कमी झाली आहे.
गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक श्री. हैदर अली खान म्हणाले, ”गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्समध्ये आम्ही ग्राहकांना शाश्वत व नाविन्यपूर्ण गतीशीलता सोल्यूशन्स देण्याप्रती कटिबद्ध आहोत. इब्लू फिओ आणि इब्लू फिओ एक्सवर मान्सून ऑफरसह आम्ही आमची उत्पादने अधिक किफायतशीर करण्यासोबत अधिकाधिक व्यक्तींना इलेक्ट्रिक वेईकल्सचा अवलंब करण्यास प्रेरित देखील करत आहोत.