Saturday, September 14, 2024

एकट्या जिराफाची शिकार करायला आले अर्धा डझन सिंह; पण गेम पलटला, जिराफाने असं काय केलं? व्हिडीओ

सिंह, ज्याला जंगलाचा राजा म्हटलं जातं. भलेभले प्राणी त्याच्याशी पंगा घेण्याची हिंमत करत नाहीत. सिंह येताना दिसताच आपला जीव वाचवण्यासाठी दूर पळतात. सिंहाला कोणताच प्राणी टक्कर देऊ शकत नाही, असं सर्वांना वाटतं. पण, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हा आपला फक्त गैरसमज आहे असंच वाटेल. कारण जंगलाचा राजा सिंहालाही टक्कर देणारा एक प्राणी आहे आणि हा एकटा प्राणी सिंहांच्या कळपावरही भारी पडला आहे. संकटं जेव्हा येतात तेव्हा ती एकटी येत नाही, चहूबाजूंनी हल्ला करतात. परंतु, आपण घाबरायचे नसते, शांत राहून संकटांचा सामना करायचा असतो. एक जिवंत उदाहरण एका व्हिडीओमार्फत आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील आश्चर्यचकित व्हाल.

सिंह हा जंगलाचा राजा आहे. मोठे प्राणीही सिंहापुढे शरण जातात. एखादा सिंह जर अचानक समोर आला, तर प्रत्येकाची तारांबळ उडणार हे सहाजिकच आहे. पण, जर तुमच्या समोर सिंहांचा कळप आला तर तुम्ही काय कराल? तुम्ही एक किंवा दोन किंवा फार तर तीन सिंहांना एकत्र पाहिलं असेल. पण, सध्या जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, त्यात एकट्या जिराफाची शिकार करण्यासाठी तब्बल अर्धा डझन सिंह एकत्र आल्याचं दिसून आलं.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सिंहाच्या टोळीनं एका जिराफाला घेरलं आहे. ते चहुबाजूंनी हल्ला करतायेत. एक-दोन नव्हे तर अनेक सिंहांनी मिळून जिराफावर हल्ला चढवल्याचे दिसते आहे. प्रत्येक सिंह वारंवार मागून जिराफाला खाली पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचंही व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं. परंतु, जिराफ त्यांना जोरदार प्रत्युत्तर देतोय. जिराफानं आपली सर्व शक्ती एकटवली आणि ते जोरदार प्रतिकार करू लागलं. त्याने आपल्या पायाचा वापर करून सर्व सिंहाला अक्षरश: तुडवलं. जिराफ सगळ्यांना एका लाथेत झटकून पाडतो. सिंह जिराफाच्या पायाला चावून त्याला खाली पाडण्याचा प्रयत्न करतात, मात्र जिराफ प्रत्येक सिंहाला पूर्ण ताकदीने लाथ मारताना दिसतो. वारंवार मार खाल्ल्यानंतर सिंह शेवटी हिंमत गमावतात आणि जिराफाला जाऊ देतात. त्यांचा पराभव केल्यावर जिराफ त्याच्या वाटेने निघून जातो. या जिराफाने मात्र सिंहाच्या टोळीला चांगलीच अद्दल घडवली.
https://x.com/gunsnrosesgirl3/status/1822163491874042187?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1822163491874042187%7Ctwgr%5E88f0ec5c736174ef6a249251167fafd9eca18296%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Ftrending%2Fvideo-on-social-media-is-going-viral-showing-the-lions-attacking-a-giraffe-pdb-95-4532620%2F

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles