भारतात सोनं खरेदीला अधिक महत्त्व दिले जाते. सणासुदीच्या काळात सोन्याला विशेष मान आहे. सध्या देशात सोन्याच्या दरात चढ-उतार सुरुच आहे. परंतु, हल्ली सोन्यामध्ये गुंतवणूक करणारे कमीच आहे.
बरेचदा इच्छा असतानाही सोनं खरेदी करण्यासाठी एकरकमी पैसे देता येत नाही. अशावेळी अनेकांना ते विकत घेणे फार कठीण जाते. हा त्रास कमी करण्यासाठी अनेक ज्वेलर्सनी ग्राहकांसाठी गोल्ड हार्वेस्ट स्कीम आणली आहे या योजनेत सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना एकरकमी रक्कम भरावी लागणार नाही. यासोबतच यामध्ये मेकिंग चार्जमध्ये सूट आणि इतर अनेक सवलतींचा लाभ मिळू शकतो. ही योजना काय आहे जाणून घेऊया.
1. गोल्ड हार्वेस्ट योजना काय आहे?
गोल्ड हार्वेस्ट स्कीम ही सोन्याची बचत करणारी योजना आहे. यामध्ये तुम्हाला दर महिन्याला ठराविक रक्कम (Price) भरावी लागेल. १० महिन्यांनंतर तुम्ही गुंतवणूक केलेली रक्कम ज्वेलर्सकडे जमा होते. या गुंतवणुकीच्या रकमेवर तुम्हाला व्याजाची सुविधा देखील देण्यात येते. या योजनेमध्ये तुम्ही १० ते १२ महिने गुंतवणूक करु शकता.
या योजनेवर ज्वेलर्स मेकिंग चार्जेसवर सूट आणि बोनसचा लाभही मिळतो. तनिष्कच्या वेबसाइटनुसार गोल्ड (Gold) हार्वेस्ट स्किममध्ये ग्राहकाला दरमहिन्याला दहा हजार रुपये जमा करावे लागतील. १० महिन्यानंतर ही रक्कम लाख रुपयांपर्यंत असेल. या रकमेवर तनिष्क ७,५०० रुपयांचा परतावा देईल. म्हणजेच तुमच्या एकूण रकमेत वाढ होईल.
2. गोल्ड हार्वेस्ट योजनेत गुंतवणूक करण्याचे फायदे
या योजनेत गुंतवणूक (Investment) केल्यानंतर सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी एकत्र रक्कम भरावी लागणार नाही.
या योजनेतून तुम्ही वर्षातून एकदाच सोने खरेदी करु शकता.
सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर ती सहज करता येईल.