मंगळवारी सोन्याचा भाव 57,322 रुपये प्रति 10 असा उच्चांकी होता. यापूर्वी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने 56,200 रुपयांचा रेकॉर्ड तयार केला होता. गेल्या विक्रमापेक्षा यावेळी सोन्याच्या किंमतींत 1000 रुपयांची तेजी दिसून आली. सोन्याचे भाव अजून वधारतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. सोने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.बुधवारी सकाळी किंमती जाहीर केल्या. 24 कॅरेट सोन्यात जवळपास 190 रुपयांची घसरण झाली. सोने 57138 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. तर चांदीत 190 रुपयांची घट होऊन किंमती 67947 रुपये प्रति किलो झाली.
सोन्याच्या दराचा नवा रेकॉर्ड… लवकरच ६२ हजाराला भिडण्याची शक्यता
- Advertisement -