Gold- Price सोन्याच्या दरात वाढ….१० ग्रॅमचा दर

0
34

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५८,८२० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५८,६६० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७१,२९० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७०,९५० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५३,९१८ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५८,८२० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,९१८ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,८२० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,९१८ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,८२० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,९१८ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,८२० रुपये आहे.