गुडरिटर्न्सनुसार, या आठवड्यात सोन्याने 500 रुपयांची चढाई केली. 23 ऑक्टोबरला किंमती 300 रुपयांनी घसरल्या होत्या. 24 ऑक्टोबर रोजी सोन्याचा भाव 240 रुपयांनी वाढला. 25 ऑक्टोबर रोजी 110 तर 26 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या किंमतीत 160 रुपयांची तेजी आली. शुक्रवारी भावात बदल दिसला नाही. आता 22 कॅरेट सोने 56,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,110 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
या आठवड्यात चांदीत घसरण दिसून आली. 23 ऑक्टोबर रोजी भाव 200 रुपयांनी घसरले. 24 ऑक्टोबर रोजी चांदीत 500 रुपयांची घसरण झाली. तर 26 ऑक्टोबर रोजी चांदीने 500 रुपयांची चढाई केली. 27 ऑक्टोबर रोजी चांदीत 500 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 74,600 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 60,984 रुपयांहून 60,825 रुपयांवर घसरले. 23 कॅरेट 60,740 रुपयांहून 60,581 रुपयांवर आले. 22 कॅरेट सोने 55,861रुपयांहून 55,716 रुपयांपर्यंत खाली आले. 18 कॅरेट 45,619 रुपये, 14 कॅरेट सोने 35,583 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीत 654 रुपयांची घसरण झाली. भाव 70,906 रुपयांपर्यंत घसरले. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.