Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६१,३७० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६१,७१० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७२,१५० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७२,२३० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५६,१५५ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६१,२६० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,१५५ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६१,२६० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,१५५ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६१,२६० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,१५५ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६१,२६० रुपये आहे