Saturday, December 7, 2024

Gold-Silver Price :सोन्याच्या दरात मोठा बदल, जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६२,३०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६२,७१० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७२,५४० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७२,४६० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५७,००८ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६२,१९० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,००८ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,१९० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,००८ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,१९० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,००८ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,१९० रुपये आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles