Saturday, December 7, 2024

Gold- Price : सोनं झालं स्वस्त,जाणून घ्या १० ग्रॅमचा दर

Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६२,५२० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६२,५०० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७१,२०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७०,३७० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५७,२०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६२,४०० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,२०० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,४०० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,२०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,४०० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,२०० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,४०० रुपये आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles