Wednesday, April 17, 2024

Gold- Price :सोन्याच्या दरात वाढ सुरूच, तर चांदीही महागली; जाणून घ्या आजचा भाव

Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६६,२६० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६६,२५० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, ७४,३८० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७४,३७० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६०,६२८ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६६,१४० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६०,६२८ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,१४० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६०,६२८ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,१४० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ६०,६२८ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,१४० रुपये आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles