Saturday, May 25, 2024

Gold-Price :सोने-चांदी महागले, १० ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागतायेत ‘एवढे’ पैसे

Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७२,५३० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७१,३१० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८४,१८० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८२,९४० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६६,३६७ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ७२,४०० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,३६७ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,४०० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,३६७ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,४०० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,३६७ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,४०० रुपये आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles