Gold-Silver Price Today: ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आहे.तुम्हीदेखील आज आठवड्याच्या सुरुवातीला सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आज थोडा दिलासा मिळू शकतो. उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याच्या दरात सोमवारी थोडी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव…
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७२,६७० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७२,९९० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८४,७३० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८५,०९० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.