Gold-Silver Price Today: सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा सोन्याच्या दराने उसळी मारल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर, चांदीच्या दरातही वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय बाजारपेठेत सोन्याला झळाळी मिळाली आहे. ऐन लग्नासराईच्या हंगामात सोन्याचे भाव कडाडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. चला तर जाणून घेऊया आजचे दर काय…
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७३,१८० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७३,४४० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८७,२५० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८७,३७० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.