Gold-Silver Price Today: सध्या लग्नसराईचा काळ आहे, त्यामुळे आता सोने चांदी खरेदीसाठी लगबग सुरु आहे. आता सोने आणि चांदीने पुन्हा दरवाढीचा गिअर टाकला. गेल्या आठवड्याप्रमाणेच या आठवड्यात मौल्यावान धातूने जोरदार मुसंडी मारली. आज सराफा बाजारात चांदीने इतिहास रचला असून चांदीचा भाव मोठ्या उच्चाकांवर पोहोचला आहे. सोने-चांदी खरेदीच्या विचारात असाल, तर घराबाहेर पडण्याआधी तुमच्या शहरातील सोने-चांदीचे ताजे दर जाणून घ्या.
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७४,०६० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७३,१८० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ९१,३२० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८७,२५० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.