Gold-Silver Price Today: चांदीच्या दरात सातत्यानं वाढ होत असून आजही उच्चांक गाठला आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती झपाट्यानं वाढत आहेत. मागच्या दीड महिन्यात सोन्यानं महागाईचा उच्चांक गाठला आहे. लग्नसराईत सोन्या-चांदीच्या भावात तेजी पाहायला मिळाल्याने ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. पाहा तुमच्या शहरात आजचा भाव काय…
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७४,१५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७४,१२० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ९४,४८० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ९३,५६० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.