Gold-Silver Price Today: सोने चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. देशांतर्गत बाजारात आजा सोन्या चांदीच्या दरात चांगलीच घट झाल्याचे दिसून आले. मोठ्या उसळीनंतर आज घसरण दिसून आली. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही मौल्यवान धातूच्या दरवाढीला आज ब्रेक लागल्याचे दिसत आहे. आता सोने आणि चांदीचा असा आहे भाव…
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७२,९१० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७४,१५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ९१,३९० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ९४,४८० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.